Posts

Showing posts from September, 2025

घायाळ पाखरू ✍️ – Sanket Koyate

 परवा एक घायाळ पाखरू, माझ्याजवळ येऊन पडलं. चिमटीत मी त्याला अलगद उचललं, प्रेमाने त्याला औषधपाणी दिलं. पंखात त्याच्या बळ येईपर्यंत मी त्याला जपून ठेवलं… आणि पंखात बळ आल्याबरोबर त्याने आकाशाकडे उड्डाण केलं. मनाच्या गाभाऱ्यात दुःख दाटून आलं, कारण… एका माणसाचं अनुकरण एका पाखराने केलं.